जिल्ह्यात आज १३८ रुग्णांची पडली भर

Foto
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६४०२ वर
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १३८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये ७८ पुरूष, ६० महिला रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६४०२ वर जाऊन पोहचली आहे. 

आज सकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६४०२ कोरोनाबाधित आढळले असून ३१२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २८७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २९८९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. परीक्षण करण्यात आलेल्या ७९५ स्वॅबपैकी १३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 
शहरातील १०१ रुग्ण
शहरात आज १०१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात रघुवीरनगर १, आलमगीर कॉलनी १, हर्सुल ३, शाहबाजार १, मुकुंदवाडी १, आंबेडकरनगर १, नवाबपुरा ३, लोटा कारंजा १, बाबूनगर ५, जाधववाडी १, गुलमोहर कॉलनी ५, देवळाईपरिसर २, कांचनवाडी ४, सहकारनगर १, रेल्वेस्टेशन परिसर २, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी २, उल्कानगरी, गारखेडा २, बंबाटनगर २, मिसारवाडी ८, हर्षनगर १, एन बारा १, एन अकरा, सिडको ३, नवजीवन कॉलनी २, हडको १, छावणी २, एमजीएमपरिसर १, पडेगाव ३, गजानन कॉलनी १०, पद्मपुरा, कोकणावाडी ३, गादियाविहार २, बुड्डीलेन १, सिडको ४, तारक कॉलनी २, उस्मानपुरा १, क्रांती चौक २, रामनगर १, समतानगर २, मिलिंदनगर १, अरिहंतनगर ५, विठ्ठलनगर ६, शिवेश्श्वर कॉलनी, मयूरपार्क १ या भागातील रुग्ण आढळून आले. 

ग्रामीण भागात ३७ रुग्ण
ग्रामीण भागातील ३७ रुग्ण आढळून आले आहे. रांजणगाव २, गोंदेगाव १, डोंगरगाव १, द्वारकानगरी, बजाजनगर 2, वाळूज महानगर सिडको, बजाजनगर ५, जिजामाता सोसायटी वडगाव १, जीवनधारा सोसायटी बजाजनगर ३, सिडको महानगर १, सपना मार्केट जवळ, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी १, इंड्रोस सोसायटी बजाजनगर १, विश्वविजय सोसायटी बजाजनगर १, कृष्णकोयना सोसायटी बजाजनगर २, वडगाव, बजाजनगर २, धनश्री सोसायटी बजाजनगर १, सायली सोसायटी बजाजनगर १, प्रताप चौक, बजाजनगर २, श्रीराम सोसायटी बजाजनगर १, शनेश्वर सोसायटी बजाजनगर १, वृंदावन हॉटेल जवळ, बजाजनगर १, साजापूर १, सारा परिवर्तन सावंगी ३, कुंभारवाडा, पैठण १, फत्ते मैदान, फुलंब्री १ या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.